पत्रकाराची दुचाकी चोरी; बार्शीत खळबळ , घरासमोर उभी केलेली Honda Dream Yuga अज्ञात चोरट्यांनी लंपास

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. ३ जून २०२६ : बार्शी शहरातील राऊळ गल्ली येथील पत्रकार निलेश झिंगाडे यांच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. झिंगाडे हे राऊळ गल्ली, घर क्रमांक ३६५० येथे वास्तव्यास असून त्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुचाकी घरासमोर पार्क करून ठेवली होती.
आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास त्यांना आपली दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता अज्ञात चोरट्यांनी रात्री अथवा पहाटेच्या सुमारास दुचाकी चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चोरीस गेलेली दुचाकी Honda Dream Yuga कंपनीची असून तिचा नोंदणी क्रमांक MH 13 BZ 4834 आहे. गाडीचा रंग काळा असून पुढील भागावर “PRESS” असा स्टिकर लावलेला आहे. त्यामुळे गाडी ओळखण्यास सोपी आहे.
या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. संबंधित दुचाकीबाबत कोणाला माहिती मिळाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मालकाशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




