क्राईमबार्शीमहाराष्ट्र

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

सोलापूर, दि. २ : राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, मद्य विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत २३ लाख ५६ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ६४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

विभागीय उपायुक्त पुणे विभाग सागर धोमकर यांच्या निर्देशानुसार तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री पं. जाधव, आणि उपअधीक्षक सौरभ बा. अदाटे0 यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २९ मे ते ३१ मे २०२६ या कालावधीत सोलापूर शहर व जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ४३ हजार १७५ लिटर रसायन, ३ हजार ७८३ लिटर हातभट्टी दारू, १६.२ बल्क लिटर देशी मद्य, १५.६ बल्क लिटर बिअर आणि १२५ बल्क लिटर ताडी असा मोठा साठा जप्त करण्यात आला. तसेच ४७ जणांवर कारवाई करून ३ वाहनांसह एकूण २३.५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी निर्मितीचे समूळ उच्चाटन करण्यावर भर दिला असून पोलीस विभाग व इतर यंत्रणांच्या समन्वयाने संयुक्त कठोर कारवाया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
5000अवैध मद्य विक्री, निर्मिती किंवा वाहतुकीसाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या मालकांनाही आरोपी करण्यात येत असल्याची माहिती विभागाने दिली. दरम्यान, मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे पुण्यात घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा विषारी दारूमुळे किडनी निकामी होणे, कायमस्वरूपीचा अंधत्व येणे व अकाली मृत्यू यांसारखे गंभीर परिणाम संभवतात, असे विभागाने स्पष्ट केले.

गुन्हे अन्वेषणाच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मे २०२५ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात १,१९७ गुन्हे, १,१०१ वारस, १,१२४ अटक आरोपी आणि ३ कोटी ३३ लाख २७ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तर जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत १,२९७ गुन्हे, १,२२१ वारस, १,२५४ अटक आरोपी आणि ५ कोटी ७३ लाख ३० हजार २०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गुन्ह्यांमध्ये ८ टक्के, वारसांमध्ये ११ टक्के, अटक आरोपींमध्ये १२ टक्के आणि मुद्देमालाच्या किमतीत ७२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मिथेनॉल, क्लोरेल हायड्रेट यांसारख्या पदार्थांच्या वापराबाबत माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा व्हॉट्स ॲप क्रमांक ८४२२००११३३ वर तात्काळ माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगितले व अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button