अपघातबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत दुचाकींच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू , अपघातानंतर तिघे ३० फूट खाली पुलाखाली कोसळले

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : बार्शी – सोलापूर रस्त्यावर शहरालगत असलेल्या घोरओढ्या येथील रेल्वे पुलाजवळ शनिवार दि. २३ मे सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात बार्शीतील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात युवराज विजय पवार (वय २१, रा. सोलापूर रोड, बार्शी) यांचा मृत्यू झाला. तर विवेक विश्वनाथ सातपुते (वय २१), सुदर्शन सुहास दळवी (वय २१) आणि सम्राट अरविंद पाटील (वय २२, सर्व रा. सासुरे, ता. बार्शी) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.5009मिळालेल्या माहितीनुसार, सासुरे येथील तिघेजण आपल्या एका मित्राला अचानक चक्कर येत असल्याने त्याला दुचाकीवरून उपचारासाठी बार्शीकडे घेऊन येत होते. त्याचवेळी बार्शीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची रेल्वे पुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.50009अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर एका दुचाकीवरील तिघेजण थेट पुलाखालच्या सुमारे २५ ते ३० फूट खोल जागेत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याचबरोबर या अपघातात दुचाकीची चाके गाडीपासून वेगळी झालेली होती. या घटनेत तिघांच्या हात-पायांना गंभीर दुखापती व फ्रॅक्चर झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुरू होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button