दिनपुणेमहाराष्ट्र

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

पुणे : ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, विविध योग संस्था तसेच संघटना यांच्या सहकार्याने सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये सुमारे ५ हजार नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

यावेळी खासदार प्रा.मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासणे, पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव संजय शेटे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, उपायुक्त माधव जगताप, डॉ. संतोष टेंगले, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आदी उपस्थित होते.500यावेळी प्रा. कुलकर्णी यांनी, नागरिकांनी योगा केल्यामुळे आरोग्य सदृढ राहते, मन प्रसन्न राहते, जीवनात सकारात्मक विचार करण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे नागरिकांनी दररोज योगा करावे असे आवाहन त्यांनी केले. श्रीमती महापौर नागपुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

‘फिट इंडिया मूव्हमेंट’ला प्रोत्साहन
देशव्यापी ‘फिट इंडिया मूव्हमेंट’च्या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय, भारत सरकारच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जिल्ह्यात साजरा करण्यात आला. योग ही सर्वांगीण आरोग्य व कल्याणासाठी जीवनपद्धती म्हणून प्रोत्साहित करण्याचा या दिनाचा उद्देश आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य व सामाजिक सहभाग यासाठी योग ही एक प्रभावी चळवळ म्हणून उदयास आली आहे, असा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी विविध प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, युवक, युवती, महिला, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि क्रीडाप्रेमी आदींनी सहभाग नोंदवला.5000मुख्य योग प्रशिक्षक मनाली देव यांच्या मार्गदर्शनाखाली ६० योग प्रशिक्षकांकडून प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून योगा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. पुणे महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सेवाभावी शैक्षणिक संस्था, योग संस्था, क्लब, मंडळे, अकॅडमी, तालुक्यांचे क्रीडा संकुल, क्रीडा मंडळे, क्रीडा संघटना तसेच युवक व महिला मंडळांनी विविध ठिकाणी स्थानिक पातळीवर योग सत्रांचे आयोजन करण्यात आले.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button