सोलापूर येथे रंगलेल्या पुणे विभागीय महिला वुशू लीग स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अस्मिता खेलो इंडिया पुणे विभागीय महिला वुशू लीग स्पर्धा सोलापूर येथील राजीव गांधी इंडोअर स्टेडियमवर नुकतीच उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट करत द्वितीय क्रमांकाचे उपविजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी विविध वजनगटांत मिळवलेले यश खालीलप्रमाणे:
- कु. समीक्षा राऊत: ६० किलो ज्युनिअर वजनगटात सुवर्णपदक
- कु. संचिती जाधव: ४५ किलो सिनिअर वजनगटात रौप्यपदक
- कु. सई भोसले: ४८ किलोखालील वजनगटात रौप्यपदक
- कु. आदिती मारकड: ४५ किलो सब-ज्युनिअर वजनगटात कांस्यपदक

या विजेत्या विद्यार्थिनींना मुख्य प्रशिक्षक फुलचंद जावळे, क्रीडा शिक्षिका सौ. दिपाली मोरे (खैरनार) आणि पांडुरंग कुदळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
वुशू खेळातील आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करत बार्शीचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल करणाऱ्या या सर्व खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे क्रीडाप्रेमी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.





