बार्शीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील अश्वमेध स्पर्धेत बॅडमिंटन मुलींच्या संघाचे नेतृत्व बार्शीच्या समृध्दी वायकुळेकडे

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : चंद्रपूर येथील अश्वमेध स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर यांचा मुला , मुलींचा बॅडमिंटन संघ रविवारी रवाना झाला. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या अश्वमेध सोर्धेत मुलींच्या बॅडमिंटन संघाचे नेतृत्व बार्शीची समृध्दी वायकुळे करणार आहे.

विशेष म्हणजे या स्पर्धेत मुलांच्या संघाचे नेतृत्वदेखील बार्शीतील श्री शिवाजी महाविद्यालयात शिकत असलेला खेळाडू अथर्व देशपांडे करणार आहे. बार्शी तिथे सरशी हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बार्शीच्या सुलाखे कॉमर्स कॉलेज मध्ये समृध्दी वायकुळे ही दुसऱ्या वर्षात शिकत आहे. आजवर बॅडमिंटनच्या राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत तिची चमकदार कामगिरी राहिली आहे. यामुळेच विद्यापीठाचा मुलींचा संघ घोषित केल्यानंतर या संघाचे कर्णधारपद विद्यापीठाने वायकुळे हिच्याकडे सोपवविले. दरम्यान , ही स्पर्धा १७ ते २२ फेब्रुवारी या काळात गोंडवाना विद्यापीठ येथे होत आहे.

सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर तसेच विद्यापीठ क्रीडा विभागाचे डॉ. अतुल लकडे , व्यवस्थापक गणेश जोरवर आदींनी दोन्ही संघातील खेळाडूंना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
मुलींच्या संघात : समृध्दी वायकुळे ( कर्णधार) , कोमल बनसोडे, प्रज्ञा पवार, साक्षी कुदळे, दिशा मोजेकर, पायल दमामी यांचा समावेश आहे.

मुलांच्या संघात : अथर्व देशपांडे ( कर्णधार ) , हर्ष घारगे , सोजल रोकडे, समर्थ कुलकर्णी, अर्शद शेख, अथर्व घाडगे, यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाय.वाय.यादव , उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील , सहसचिव अरुण देबडवार , खजिनदार जयकुमार शितोळे तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख तसेच कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय कारंडे यांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button