क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : बार्शी शहरातील दुधवाला चौक परिसरात सुरू असलेल्या कल्याण-मुंबई मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत रोख रक्कम, दोन मोबाईल फोन व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सहायक पोलीस अधीक्षक तथा अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी अंजना कृष्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाने ही कारवाई केली. गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दुधवाला चौक येथील शिवांश प्लॅस्टिक या दुकानामध्ये कल्याण-मुंबई मटका जुगार चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोहेकॉ. बाबासाहेब घाडगे, पोकॉ. हनुमंत पाडुळे, मपोकॉ. नम्रता गटकुळ व चालक पोकॉ. भाऊसाहेब महानोर यांनी पंचांसमक्ष सोमवार दि. १ जून रोजी दुपारी सुमारे ४ वाजता छापा टाकला. यावेळी दुकानात एक व्यक्ती मटका जुगाराचा हिशोब करताना आढळून आली.500पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने आपले नाव सोमनाथ सुभाष कवठाळकर (वय ५२, रा. वाणी प्लॉट, आगळगाव रोड, बार्शी) असे सांगितले. त्याच्या झडतीत १६ हजार ३०० रुपये रोख रक्कम, सॅमसंग अल्ट्रा २६ व विवो व्ही-५० कंपनीचे दोन मोबाईल फोन, गणकयंत्र, पावती पुस्तके, आकडेमोड केलेल्या चिठ्ठ्या, पेन व इतर जुगार साहित्य मिळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन व जुगार साहित्य असा एकूण १ लाख ५६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चौकशीदरम्यान ताब्यातील आरोपीने हा मटका जुगार लखन सुभाष विघ्ने (रा. खुरपे बोळ, बार्शी) यांच्या सांगण्यावरून चालवत असल्याची माहिती दिली. त्यानुसार सोमनाथ सुभाष कवठाळकर व लखन सुभाष विघ्ने या दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अन्वये बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button