यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कडक कारवाई; मालवंडीत अवैध दारू विक्री उघड, ७ हजारांहून अधिक किमतीचा साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : तालुक्यातील मालवंडी येथे ग्रामदैवत शेखागौरी यात्रेनिमित्त वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्तीदरम्यान अवैध दारू विक्रीवर कारवाई करत एकास ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे ७,४७० रुपयांचा विविध प्रकारचा दारू साठा जप्त करण्यात आला असून, संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ३ मे) यात्रेनिमित्त परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना गोपनीय माहितीच्या आधारे बार्शी-मालवंडी मार्गावरील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. गवळी यांच्या स्टील दुकानाजवळील पत्र्याच्या शेडमागे एक व्यक्ती दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचांसह पोलिसांनी सापळा रचला.5000छाप्यादरम्यान संशयित व्यक्ती पिशवीसह बसलेली आढळून आली. पोलिसांची चाहूल लागताच तो पळण्याच्या तयारीत होता; मात्र तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव अहमद इसाक मुजावर (वय ४१, रा. मालवंडी, ता. बार्शी) असे सांगितले.

झडती घेतली असता त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात मॅकडॉल नंबर १, मास्टर डिलाईट, रॉयल स्टॅग, इम्पेरियल ब्लू, क्लासिक गोल्ड, रोमानोव्ह वोडका तसेच देशी दारूचा समावेश आहे.

पोलिसांनी नमुना म्हणून काही बाटल्या सीलबंद करून उर्वरित माल पोलीस ठाण्यात जमा केला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मारुती शेलार यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५ (ई) अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.500

ही कारवाई सहायक पोलीस फौजदार गवळी, हेडकॉन्स्टेबल घाडगे, पोलीस नाईक कावळे, कॉन्स्टेबल चौधरी व शेलार यांच्या पथकाने केली. यात्रेच्या काळात अशा कारवायांमुळे अवैध व्यवसायांवर अंकुश बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या