माऊली उद्योग समूहाचे बार्शीत ‘माऊली लॉज बँक्वेट हॉल’चे उद्घाटन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : शहरातील राऊत परिवाराच्या माऊली उद्योग समूहाच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या ‘माऊली लॉज & बँक्वेट हॉल’चे उद्घाटन राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.5000यावेळी उपस्थित मान्यवरांनी राऊत परिवारास नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा देत, शहरात दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या नव्या लॉजमुळे बार्शीमध्ये येणाऱ्या नागरिकांना व पाहुण्यांना चांगल्या दर्जाची राहण्याची सोय उपलब्ध होणार असल्याचेही यावेळी राजेंद्र राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नमूद केले.5000
माऊली उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, लॉजमध्ये एसी व नॉन-एसी अशा सुसज्ज व हवेशीर खोल्या, प्रत्येक खोलीला संलग्न स्वच्छतागृह, २४ तास गरम पाण्याची सुविधा, एलईडी टीव्ही व हाय-स्पीड वाय-फाय उपलब्ध आहे. तसेच बसस्थानक, रेल्वे स्थानक व महामार्गाच्या जवळ असल्याने प्रवाशांसाठी सोयीचे ठिकाण ठरणार आहे.
500बँक्वेट हॉलमध्ये लग्नसमारंभ, साखरपुडा, वाढदिवस, कॉर्पोरेट बैठका व इतर कौटुंबिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल, स्वतंत्र डायनिंग व्यवस्था, सेंट्रल एसी सुविधा, आकर्षक इंटेरिअर, दर्जेदार प्रकाशयोजना व स्टेजची सोय करण्यात आली आहे. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या