उद्यापासून श्री शेखागौरी यात्रा महोत्सवाचे आयोजन, तीन दिवस रंगणार धार्मिक व सांस्कृतिक सोहळा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या श्री शेखागौरी यात्रेनिमित्त मालवंडी (ता. बार्शी) येथे सालाबादप्रमाणे यंदाही भव्य व आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. १ मे २०२६ पासून सुरू होणारा हा यात्रा महोत्सव दि. ३ मे २०२६ पर्यंत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.5000वर्षभराच्या धकाधकीनंतर गावकऱ्यांसह पुणे-मुंबई येथे उदरनिर्वाहासाठी गेलेले नागरिक यात्रेनिमित्त गावाकडे परत येतात. त्यामुळे गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. माताभगिनींच्या औक्षणाने पाहुण्यांचे स्वागत होत असून सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे तरुण-तरुणींमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे.5000शेखागौरी मंदिर हे गावातील विविध धर्मीय लोकांमध्ये बंधुभाव व एकतेचे प्रतीक मानले जाते. या देवस्थानामुळे गावात सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेची भावना दृढ झाली आहे. “भेद सारे मावळू द्या…” या उक्तीप्रमाणे गावात कोणताही भेदभाव नसून सर्वजण एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात.5000यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी संदल व ताशे जंगी मुकाबला तसेच ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी सोंगांचे कार्यक्रम, जंगी मुकाबला, ‘पुण्याचे पाखरू’ नाटक आणि लोकनाट्य तमाशा सादर केला जाणार आहे. तिसऱ्या दिवशी कल्लगीतुरा, लोकगीत, धनगर ओव्या तसेच कुस्त्यांचा फड रंगणार असून रात्री भव्य समारोपाचा कार्यक्रम होणार आहे.5000या यात्रेमुळे मालवंडी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. — आपले नम्र : समस्त ग्रामस्थ व यात्रा कमिटी, मालवंडी

यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन खालील प्रमाणे

शुक्रवार, दिनांक १/५/२०२६
​रात्री ठीक १०:०० वाजता: संदल व ताफे जंगी मुकाबला ​रात्री ठीक ११:०० वाजता: ऑर्केस्ट्रा धुमाकूळ (बारामती)
​टीप : शोभेचे दारूकाम (जी.एम.फायरवर्क्स, बार्शी)

​शनिवार, दिनांक २/५/२०२६ ​रात्री ठीक ८:०० वाजता: पारंपारिक सोंगांचा कार्यक्रम ​रात्री ठीक ९:०० वाजता: जंगी मुकाबला (अमर बँड, बारामती; बाबूलाल ब्रास बँड, विंचूर; शेख मास्टर बँड, नाशिक) ​रात्री ठीक ११:०० वाजता: पुण्याचं पाखरू (सिनेतारका: वर्षा पवार निर्मित) रात्री ठीक ११:०० वाजता: बुवासाहेब पिंपरीकर यांचे लोकनाट्य तमाशा मंडळ ​टीप : शोभेचे दारूकाम (मयूर फायरवर्क्स, तेरखेडा; स्टार फायरवर्क्स, माणकेश्वर; सुपर फायरवर्क्स, आष्टी)

​रविवार, दिनांक ३/५/२०२६ ​सकाळी ठीक १०:०० वाजता: कलगीतुरा, लोकगीते व धनगर ओव्यांचा कार्यक्रम ​सकाळी ठीक ३:०० वाजता: जंगी कुस्त्यांचा फड ​रात्री ठीक ९:०० वाजता: मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळ, करवडे5000

50000

50000

5000

50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या