बुलढाणामहाराष्ट्रयोजना

प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना; विस्तारीत टप्पा-2 व 3 मध्ये जिल्ह्यातील 16 हजार 177 लाभार्थ्यांची जोडणी

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बुलढाणा : केंद्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा उज्वला समितीही स्थापन करण्यात आले असून प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना विस्तारीत-2 व 3 मध्ये आतापर्यंत 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे.50000प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेअंतर्गत विस्तारीत योजना 1 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील, 1 लाख 89 हजार 347 लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार देशात विस्तारीत-2 मध्ये 75 लाख तर विस्तारीत-3 मध्ये 25 लाख असे एकूण 1 कोटी अतिरिक्त गॅस जोडण्या मंजूर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विस्तारीत-2 मध्ये 8 हजार 694 लाभार्थी तर विस्तारीत-3 मध्ये 7 हजार 483 लाभार्थी असे एकूण 16 हजार 177 लाभार्थ्यांना जोडणी देण्यात आली आहे.5000प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वच्छ, सुरक्षित आणि परवडणारे LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे हा आहे. तसेच पारंपरिक इंधनाचा वापर कमी करणे, महिलांचे व कुटुंबाचे आरोग्य सुधारणा, धूरमुक्त स्वयंपाकघर निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ही योजना केवळ गॅस कनेक्शनपुरती मर्यादित नसून महिलांच्या सशक्तीकरणाचा एक प्रभावी सामाजिक उपक्रम आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button