पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

बार्शीचे प्राचार्य प्रदीप हरिदास यांचा उत्कृष्ट आयटीआय पुरस्काराने सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथील संत विसोबा खेचर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रदीप हरिदास यांना सन २०२३-२०२४ या वर्षासाठी “उत्कृष्ट आयटीआय” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबई येथील शासकीय तांत्रिक प्रशाला येथे पार पडला. यावेळी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदिप हरिदास यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यास व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे सतीश सूर्यवंशी, विभागाच्या मुख्य सचिव मनीषा वर्मा तसेच रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांची प्रमुख उपस्थिती होती.5000
प्राचार्य प्रदीप हरिदास हे यापूर्वी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू वामनराव पै शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी आदिवासी भागातील युवकांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याचे उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे विविध स्तरांतून प्राचार्य प्रदीप हरिदास यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button