क्राईमबार्शीमहाराष्ट्र

पैठण कारागृहातून पळालेला न्यायालयीन बंदी बार्शीत जेरबंद; पैठण पोलिसांच्या ताब्यात

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : पैठण कारागृहातून पलायन केलेला न्यायालयीन बंदी बार्शी शहर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेत पैठण पोलिसांच्या स्वाधीन केला. या कारवाईमुळे फरार बंदीला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा पैठण कारागृहात न्यायालयीन बंदी म्हणून असून त्याचा बंदी क्रमांक C-5790 आहे. तो दि. २५ जानेवारी २०२६ रोजी कारागृह परिसरात शेतीचे काम करत असताना सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत फरार झाला होता.50000दरम्यान, सदर आरोपी बार्शी शहरात असल्याची गोपनीय माहिती बार्शी शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पैठण पोलीस ठाण्याच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आले.50000ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, पोलीस उपनिरीक्षक अभय माकने, पोहेकॉ रियाज शेख, प्रवीण साठे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, राहुल उदार, अंकुश जाधव, अविनाश पवार, वैभव भांगे, प्रल्हाद अकोलवार, अजित शेख, सतीश उघडे, दत्ता सोमवाड आणि सचिन नितनाथ यांनी पार पाडली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button