सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक स्थळे परिसरात कलम 163 अन्वये ड्रोन उडविण्यास बंदी
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर दि. 27: चैत्रवारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांवर दिनांक 25 मार्च 2026 ते दिनांक 2 एप्रिल 2026 कालावधीत ड्रोन उडविण्यास कलम 163 अन्वये बंदी घालण्याचा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी जारी केला आहे.
यात्रा कालावधीत लाखो वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यात्रेच्या दरम्यान संभाव्य दहशतवादी धोका व ड्रोनद्वारे घातपात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने ही खबरदारीची उपाययोजना केली आहे. यानुसार श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूर व श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट या प्रमुख धार्मिक स्थळांवर तसेच जिल्ह्यातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन उडविण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व ड्रोन परवाना धारक व चालकांनी त्यांच्या ड्रोनची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच हा आदेश दिनांक 25 मार्च 2026 पासून पुढील 60 दिवस सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण हद्दीत (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) व सर्व नगरपालिका हद्दीत लागू राहणार आहे. असे अपर जिल्हादंडाधिकारी अभिजीत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.





