मानेगाव नगरीत श्री अन्नपूर्णा देवी यात्रेचा उत्साह; छबिना, ऑर्केस्ट्रा आणि ‘जंगी मुकाबला’ कार्यक्रमांची मेजवानी

B1न्यूज मराठी नेटवर्क
माढा मानेगाव (थो.) : येथील ग्रामदैवत श्री अन्नपूर्णा देवी यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण मानेगाव नगरी भक्तांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. ९ एप्रिल ते ११ एप्रिल या कालावधीत हा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे:
९ एप्रिल २०२६: छबिना आणि नादखुळा ऑर्केस्ट्रा यात्रेच्या पहिल्या दिवशी, गुरुवारी सायंकाळी ६:०० वाजता देवीचे माळावर प्रस्थान होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ‘प्रणय बँजो, करमाळा’ हे असणार आहेत. त्यानंतर रात्री ८:०० वाजता बाजार पटांगण येथे ‘मराठमोळा नादखुळा’ या भव्य ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
१० एप्रिल २०२६: माळावरील यात्रा
शुक्रवारी माळावर मुख्य यात्रेचा उत्साह असेल. यावेळी भाविकांच्या मनोरंजनासाठी रात्री ८:०० वाजता प्रसिद्ध कलाकार ‘शिफा पुणेकर’ यांचा गाण्यांचा आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम पार पडणार आहे.
११ एप्रिल २०२६: देवीचे आगमन आणि जंगी मुकाबला शनिवारी देवीचे गावात पुनरागमन होणार असून ‘शेरणी’चा कार्यक्रम पार पडेल. यात्रेची सांगता रात्री ९:०० वाजता ‘कलागुणांचा कार्यक्रम (जंगी मुकाबला)’ ने होईल. या दिवशीही प्रणय बँजो, करमाळा आपली कला सादर करतील.
आयोजक : श्री अन्नपूर्णा देवी यात्रा कमिटी, मानेगाव (थो.) यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




