कृषीमहाराष्ट्रसोलापूर

गारपीट आणि अवकाळी पावसाचा तडाखा : मोहोळ तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान; खासदार प्रणिती शिंदे यांची पाहणी, तातडीच्या मदतीची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

मोहोळ : मोहोळ तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या अचानक बदललेल्या हवामानामुळे काढणीस आलेली पिके व फळबागा मोठ्या प्रमाणात जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या “हातातोंडाशी आलेला घास हिरावला” गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
तालुक्यातील द्राक्ष, केळी, कांदा, पेरू यांसह विविध फळबागा, भाजीपाला आणि काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पूर्णतः नुकसानग्रस्त झाली आहेत.
50000आज सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील पापरी, येवती, खंडाळी आदी गावांना भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.5000या पाहणी दौऱ्यावेळी मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, कुमार गोडसे, बाबुराव भोसले, दत्तात्रय कदम, भारत मुळे, सुनील वाघमारे, उत्तम मुळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button