येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवी यात्रेत भाविकांना महाप्रसाद वाटप

0

मंगळवार पेठ बार्शी येथील श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाचा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शी शहरातील मंगळवार पेठ येथील श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाच्या वतीने श्री क्षेत्र येरमाळा येथे चैत्र पौर्णिमा निमित्त श्री येडेश्वरी देवी यात्रेत भाविक भक्तांसाठी मोफत दालचा मसाला भात व बुंदीचा लाडू महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आला. मंडळाचे हे सातवे वर्ष असून मंडळ प्रत्येक वर्षी मोफत महाप्रसादाचा उपक्रम राबवत असते. 5000समाजातील दानशूर व्यक्तीच्या पुढाकारातून तसेच मंडळातील सदस्य यांच्या वर्गणीच्या माध्यमातून हा महाप्रसादाचा उपक्रम अखंडपणे चालू आहे. श्री क्षेत्र येरमाळा येथे श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेत सहभागी होणाऱ्या हजारों भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. 5000या उपक्रमाचे श्री येडेश्वरी देवी भाविक भक्तांनी मंगळवार पेठ श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाचे आभार मानत कौतुक केले. या मोफत महाप्रसाद वाटप प्रसंगी मंगळवार पेठ श्री येडेश्वरी देवी भक्त मंडळाचे सर्व कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या