उद्घाटनछत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाचे उद्घाटन व हिरवी झेंडी दाखवून रवाना

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

छत्रपती संभाजीनगर, दि.७ : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात योजनांची माहिती देणारा चित्ररथाचे उद्घाटन आज करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ ला आज जिल्ह्यात १० ठिकाणी प्रारंभ झाला.50000याप्रसंगाचे औचित्य साधून देवणी येथील शिबिरात या रथाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिंदे, पंचायत समिती सदस्य पुष्पाबाई साळुंखे, गयाबाई ठोंबरे तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, तहसिलदार शिवानंद बिडवे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने व स्थानिक लोकप्रतिनिधी कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातिल १६८ गावांमध्ये हा चित्ररथ जाऊन नागरिकांना सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणार आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button