बार्शीतील शाही नाईकवाडी ईदगाह येथे ईद-उल-फित्रचा जल्लोष; रमजान ईद उत्साहात साजरी

0

बार्शीत शाही ईदगाहवर हजारोंची उपस्थिती; एकता, शांतता आणि बंधुत्वाचा संदेश

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : बार्शी येथे ईद-उल-फित्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी (१९ मार्च) संध्याकाळी चंद्रदर्शन न झाल्यामुळे रमजान महिन्याचे ३० उपवास पूर्ण झाले आणि त्यानंतर शनिवार हा ईदचा मुख्य दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.
रमजान महिनाभर मुस्लिम बांधवांनी उपवास, नमाज आणि आत्मशुद्धी साधत गरिबांच्या वेदना समजून घेतल्या. ईदच्या दिवशी ‘जकात-उल-फित्र’च्या माध्यमातून गरजूंना मदत करून समाजात समानतेचा संदेश दिला जातो.
5000बार्शी येथील शाही नाईकवाडी ईदगाह येथे सकाळी मदिना मस्जिदचे मौलाना अन्वारुल हक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ईदची नमाज मोठ्या उत्साहात अदा करण्यात आली. यावेळी बार्शी शहरासह परिसरातील शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमाजानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला.
5000लहान मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. देशात सुख-समृद्धी, शांती आणि सर्व समाजात एकोपा नांदावा यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. सर्वांनी एकमेकांचा आदर करावा, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे आणि गरजूंना मदत करावी असा संदेशही यावेळी देण्यात आला. तसेच बार्शी शहरासह संपूर्ण देशात सुख-समृद्धी आणि शांतता प्रस्थापित व्हावी यासाठीही प्रार्थना करण्यात आली.5000या प्रसंगी बार्शी पोलीस प्रशासनाकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विविध राजकीय व सामाजिक मान्यवरांनीही भेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि बंधुत्वाचा संदेश दिला. संपूर्ण परिसर आनंद, एकता आणि उत्साहाने भारलेला दिसून आला.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या