उद्घाटनमहाराष्ट्रसांस्कृतिकसोलापूर

ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ कार्यक्रमाचे ॲड. शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक – सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान धनादेशाचे वितरण करण्यात आले.

सोलापूर : जगातील सर्वात कमी वयाचा अध्यात्मिक बालसाहित्यिक म्हणून माऊलींकडे पाहिले जाते. त्यांचे साहित्य मानवी मनाला समाधान व शांती देणारे असून आजच्या धकाधकीच्या जीवनात आत्मशांती मिळविण्यासाठी माऊलींचे विचार आवश्यक आहेत, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने आयोजित ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम ‘ज्ञानियांचा राजा, मोगरा फुलला’ चे उद्घाटन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्या हस्ते ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. हा कार्यक्रम सरस्वती विद्यामंदिर, सोलापूर येथे पार पडला.5000कार्यक्रमास आमदार सुभाष देशमुख, मोहन डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शहाजी पवार, शाळेचे संचालक प्रशांत बडवे, देवसर तसेच इतर मान्यवर व भजनी मंडळे उपस्थित होती. सर्वांचा आत्मा एकच असून मानवता हा एकच धर्म आहे. हे सर्व जगाला पटवून देण्यासाठी माऊलींनी ज्ञानेश्वरीचे लिखाण केले आणि तेही अतिशय सर्वसामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत त्याचे भाषांतर केले. 5000सांस्कृतिक कार्य विभागामार्फत हे माऊलींचे विचार जगभरातील सर्व देशात पटवून देण्याचे कार्य केले जाईल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यक्रमाचे वेगळेपण अधोरेखित करताना सांगितले की, “मोगरा फुलला या अभंगांमध्ये मानवी मनाला नवसंजीवनी देण्याची ताकद आहे. हा कार्यक्रम भारताबाहेर इतर देशात सादर करून ‘पसायदान’चे महत्व तेथील लोकांना पटवून दिले जाईल.50000कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले. यामध्ये बार्शी, उत्तर सोलापूर व धाराशिव येथील भजनी मंडळांचा समावेश होता. अनुदानाचे धनादेश मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे सादरीकरण गायक गणेश शिंदे व संमती शिंदे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button