बार्शी

यशोदा पार्क प्रतिष्ठानच्या वतीने कारगिल विजय दिन साजरा

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : येथील यशोदा पार्क प्रतिष्ठानच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त भारतमातेचे संरक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली अर्पण करीत ऋण व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.विनोद गायकवाड हे होते. या दिनाच्या औचित्याने यशोदा पार्क कॉलनीमधील माजी सैनिक मेजर चांदणे, मेजर सुरेश पिंगळे, सेवेत असणारे मेजर हनिफ बागवान यांचे वडील यांचा शाल पुष्पगुच्छ देवून प्रातिनिधीक स्वरुपात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मेजर सुशेन चांदणे,मेजर सुरेश पिंगळे यांचेसह डॉ. हनुमंत तिकटे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शंकर अंकुश यांनी सादर केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव धनंजय काळे इतर पदाधिकारी रणजित दराडे, दादा ताटे, श्रीकांत ढेरे यांचेसह अर्जुन कडगंची, लक्ष्मण लवळे, बिभीषण कवडे, कानगुडे , विजय कांबळे, किरण लांडे , सचिन लवळे इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रतिष्ठानचे खजिनदार गणेश वाघमारे यांनी केले. तर आभार प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विशाल नलवडे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button