कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते प्रा. राहुल पालके यांचा नेट-सेट परीक्षेतील उत्तुंग यशाबद्दल सत्कार संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथे इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. राहुल पालके यांनी २० व्यांदा नेट-सेट परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळविले आहे. त्यांनी यूजीसीमार्फत डिसेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नेट (राष्ट्रीय पात्रता चाचणी)परीक्षेत आदिवासी आणि प्रादेशिक भाषा व साहित्य या विषयात यश मिळवले आहे. त्यानिमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व सन्मान कुलगुरू कक्षामध्ये करण्यात आला. याप्रसंगी मा.ए. बी. पवार, सहाय्यक कुलसचिव, मा. प्राचार्य प्रा. सुग्रीव गोरे हे उपस्थित होते.5000डॉ. पालके यांनी या अगोदर इंग्रजीत ११ वेळा, मराठीत २ वेळा, हिंदीत २ वेळा,वुमेन स्टडीज, तुलनात्मक साहित्य , भाषाशास्त्र तसेच अर्थशास्त्र या विषयांत प्रत्येकी १ वेळा उत्तीर्ण झालेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते अमिताव घोष यांच्या कांदबरी लेखनातील सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक अभ्यासासाठी त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून
पीएच.डी ही पदवी प्राप्त झालेली आहे. श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे सहाय्यक प्राध्यापक अध्यापन मागील ११ वर्षांपासून ते अध्यापन करीत आहेत.

याप्रसंगी कुलगुरू महानवर म्हणाले, डॉ पालके यांच्या यशाचे रहस्य त्यांचा विषयाचा व्यासंग, अभ्यासातील सातत्य व वाचन यात आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा व आत्मविश्वास वाढेल. ते या परीक्षांचा अभ्यास करण्यास उद्युक्त होतील. यापुढे डॉ. पालके यांनी असेच ज्ञानात अद्ययावत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत राहावे व यशाचा आलेख आधिकाधिक उंचवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी उत्तम पद्धतीने हे कार्य करावे त्यासाठी विद्यापीठ सदैव त्यांच्याबरोबर आहे. त्यांनी डॉ.पालके यांना पुढील शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ.पवार म्हणाले,पालके सरांच्या यशातून विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त आहे. विविध विषयांतून त्यांनी मिळविलेले हे यश उत्कृष्ट आहे. मनात तीव्र इच्छा असेल तर सामान्य परिस्थितीतून असामान्य कार्य करता येते, असे डॉ. पालके म्हणाले. त्यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जीवनावर आधारित स्वलिखित कर्माक्षरे हे पुस्तक कुलगुरुंना भेट दिले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या