कृषीपुणेपुरस्कारमहाराष्ट्र

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅब मध्ये उपलब्ध आहे. जास्तीत जास्त शेतकरी, संस्था, गटांनी पुरस्कारासाठीचे अर्ज ऑनलाईनरित्या सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.50000राज्यामध्ये दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात अतुलनीय व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला, व्यक्ती तसेच संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध पुरस्कार देण्यात येतात. कृषी पुरस्कारांसाठी सन २०२५ पासूनचे अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यानपंडित पुरस्कार, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), युवा शेतकरी पुरस्कार तसेच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे.

50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button