बार्शी प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सचिन अपसिंगकर, उपाध्यक्ष चंद्रकांत करडे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : येथील दैनिक वृत्तपत्र पत्रकारांची संघटना असलेल्या बार्शी ‘प्रेस क्लबच्या’ अध्यक्षपदी ‘सुराज्य’ चे सचिन अपसिंगकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी चंद्रकांत करडे सचिवपदी गणेश गोडसे, खजिनदारपदी उमेश पवार तर सहसचिवपदी गणेश घोलप यांची निवड करण्यात आली. समर्थ व्यायाम शाळा येथे रविवारी (दि. २२) सायंकाळी झालेल्या बैठकीत वृत्तपत्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतचे अरुण बळप होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एन. आर. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

पुढील २ वर्षासाठी निवडलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे अध्यक्ष- सचिन अपसिंगकर (सुराज्य), उपाध्यक्ष – चंद्रकांत करडे (दिव्यमराठी), सचिव – गणेश गोडसे (पुढारी), खजिनदार – उमेश पवार (सकाळ), सहसचिव – गणेश घोलप (जनमत), यांची निवड करण्यात आली.50000प्रेस क्लबचे मार्गदर्शक म्हणून एन. आर. कुलकर्णी, भ.के. गव्हाणे, अरुण बळप, अजित कुंकूलोळ, सचिन वायकुळे तर सदस्यपदी शहाजी फुरडे-पाटील, गणेश भोळे, कदीर बागवान, विजय निलाखे, प्रशांत खराडे, नंदकुमार माढेकर, गणेश शिंदे, प्रशांत काळे, सुनील अवघडे, धीरज शेळके, प्रशांत गायकवाड आणि उमेश काळे यांची निवड करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार एन. आर. कुलकर्णी आणि अरुण बळक यांच्याहस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या