समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

अहिल्यानगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, संगमनेर येथील माजी विद्यार्थी तुषार सूर्यभान साळवे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत तालुका कृषी अधिकारी (वर्ग–१/गट-ब) या पदावर निवड झाली आहे.

साळवे यांनी समाजकल्याण वसतीगृह, संगमनेर येथे वास्तव्यास असताना स्पर्धा परीक्षेची तयारी केली. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास व जिद्दीच्या बळावर त्यांनी हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

​या यशामागे वसतीगृहातील संस्कार, मार्गदर्शन व प्रेरणादायी वातावरणाचा मोठा वाटा आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आपुलकीने जपणाऱ्या दीपाली गांगुर्डे (स्वयंपाकी), मार्गदर्शक महानोर व अनिल गर्जे तसेच वसतीगृहातील इतर कर्मचारी वर्गाचे मोलाचे सहकार्य त्यांना लाभले.

​या यशाबद्दल समाजकल्याण आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ, प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी साळवे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. साळवे यांच्या या यशामुळे समाजकल्याण विभागाचा गौरव वाढला असून, ही यशोगाथा वसतीगृहातील तसेच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या