बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शी – सोलापूर जिल्ह्यातील पहिली AI प्रमाणित शाळा

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : फिनिक्स पोदार लर्न स्कूल (PPLS), बार्शी यांनी सोलापूर जिल्ह्यातील पहिली AI प्रमाणित शाळा होण्याचा मान मिळवून इतिहास घडवला आहे. या यशामुळे पी.पी.एल.एस. बार्शी ही महाराष्ट्रातील तिसरी आणि भारतातील बारावी AI प्रमाणित शाळा ठरली असून, संपूर्ण परिसरासाठी ही अभिमानास्पद बाब आहे.

रिलायन्स जिओ टीमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी सखोल कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. इयत्ता ६ ते ९ मधील सर्व विद्यार्थी तसेच संपूर्ण शिक्षकेतर व शिक्षण कर्मचारी यांना यशस्वीरित्या प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामुळे ते भविष्यातील तंत्रज्ञानासाठी सज्ज झाले आहेत.

शाळा डीसीपी विजय कबाडे सर, अध्यक्ष वैशाली विजय कबाडे मॅडम आणि सचिव संदीप बारडे सर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सातत्याने प्रगती करत असून, आधुनिक शिक्षण पद्धतींसाठी नेहमीच प्रेरणा देत आहे. मुख्याध्यापक रविराज बेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.पी.एल.एस. बार्शी ही शाळा दर्जेदार शिक्षण व विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे यश शाळेच्या नवोन्मेष, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि भविष्याभिमुख दृष्टिकोनाचे द्योतक आहे.5000

हा प्रशिक्षण कार्यक्रम बार्शी जिओ कार्यालयातील टीम – नसीम काझी (GMC – HR), वसीम खान (शाखा व्यवस्थापक), महुमद चाउस (ABM) आणि राहुल गव्हाणे (JPL) यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.500000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button