क्रांती धिरज शेळके हिला “स्काऊट-गाईड विद्यार्थी राज्य पुरस्कार” प्राप्त!

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : महाराष्ट्र विद्यालयातील इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत असलेली कु. क्रांती धिरज शेळके हिने राज्यस्तरीय स्काऊट-गाईड चाचणीत उल्लेखनीय यश संपादन करत “स्काऊट-गाईड विद्यार्थी राज्य पुरस्कार” प्राप्त केला आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. क्रांती धिरज शेळके सह सर्व विद्यार्थ्यांचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शिस्त, सेवा, नेतृत्व आणि सामाजिक जाणीव या स्काऊट-गाईड मूल्यांचा आदर्श घालून देणारे आहे.

दि. २७ जानेवारी ते ३० जानेवारी व ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रामबाग, भोर (जि. पुणे) येथे राज्य पुरस्कार चाचणी व राज्यस्तरीय स्काऊट-गाईड विद्यार्थी परीक्षा पार पडली. या कठीण व सर्वांगीण क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना “स्काऊट-गाईड विद्यार्थी राज्य पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या राज्य पुरस्कारासाठी क्रांती धिरज शेळके सह प्राची सुनील शिंदे, श्रुती हरिदास दांगट, शरयू राहुल ठोंगे, श्रावणी राहुल हणमंते, प्रतीक्षा अतुल आवारी तसेच सुखदेव प्रकाश गव्हाणे, संस्कार योगेश उपळकर, श्रेयस प्रवीण पांगरे, स्वर्णीम सुशीलकुमार मुठाळ, वेदांत संतोष गव्हाणे, अथर्व श्रीराम सातपुते, रणवीर काकासाहेब गुंड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.500000

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना योगेश उपळकर, पी. डी. पाटील, अतुल नलगे, श्रीमती चौधरी, श्रीमती लोमटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष एन. एन. जगदाळे, सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी. टी. पाटील, सहसचिव ए. पी. देबडवार, खजिनदार तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख जयकुमार शितोळे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. मिराताई यादव, एस. बी. शेळवणे, तसेच सर्व कार्यकारिणी व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले. याशिवाय सोलापूर जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, गाईड संघटक श्रीमती अनुसया सिरसाट, विद्यालयाच्या प्राचार्या के. डी. धावणे, उपमुख्याध्यापक आर. बी. सपताळे, पर्यवेक्षक श्री मदने, पर्यवेक्षिका श्रीमती एन. बी. साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या