त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्षमय प्रवासात खंबीरपणे साथ देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन, सोलापूर येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार उपस्थित होते.

यावेळी अभिवादन करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, माता रमाई यांनी बाबासाहेबांच्या वादळी व संघर्षपूर्ण आयुष्यात न डगमगता सहचारिणी म्हणून मोलाची भूमिका बजावली. वैयक्तिक सुखांचा त्याग करत, प्रसंगी आपली पोटची मुले गमावल्यानंतरही त्यांनी खंबीरपणे संघर्ष सुरू ठेवला. समाजहितासाठी हालअपेष्टा सहन करत त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक कार्याला बळ दिले. त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनात माता रमाई यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे व प्रेरणादायी आहे.

अशा त्याग, संयम आणि कर्तृत्वाच्या प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, माजी महापौर संजय हेमगड्डी, नगरसेवक नरसिंह आसादे, माजी नगरसेवक प्रवीणदादा निकाळजे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक खन्ना, उपाध्यक्ष बसवराज म्हेत्रे, राजन कामात, अनिल मस्के, लखन गायकवाड, परशुराम सतारेवाले, सागर उबाळे, संजय गायकवाड, सुनील सारंगी, सुभाष वाघमारे, नूरअहमद नालवार, धीरज खंदारे, माजी महिला अध्यक्ष सुमन जाधव, करीमुनिसा बागवान, शोभा बोबे, मुमताज तांबोळी, ज्योती गायकवाड, संघमित्रा चौधरी, प्रतीक्षा निकाळजे, सलीमा शेख, अनिता भालेराव, मेघशाम गौडा, ईश्वर म्हेत्रे, शिवाजी साळुंखे, मोहसीन फुलारी, अभिलाष अच्युगटला, सुनील डोळसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या