जयंतीपुणेमहाराष्ट्र

संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे, दि.७: थोर समाजसुधारक, कीर्तनकार आणि लोकसंत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने सदाशिव पेठ येथील भरत नाट्य मंदिर येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संत गाडगेबाबांच्या विचारांचा जागर केला जाणार असून, यात भजन, कीर्तन आणि भारुडाचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाईल. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रसिद्ध निवेदिका अनघा मोडक यांचे निरूपण लाभणार असून, गायिका केतकी भावे-जोशी आणि ओमकार प्रभूघाटे यांच्या गायनाने हा सोहळा रंगणार आहे.या सर्वांना यशस्वी वाद्यवृंद साथसंगत करणार आहेत. तसेच, हमीद सय्यद यांचे प्रबोधनात्मक भारूड,शाहिर बाळासाहेब मालुसकर यांची शाहिरी आणि कीर्तनकार संदीप पाल महाराज यांचे कीर्तन श्रोत्यांसाठी पर्वणी ठरेल.

हा संपूर्ण कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी प्रवेश विनामूल्य असून, जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
​

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button