नागपूरमनोरंजनमहाराष्ट्र

रामटेकच्या विकासासाठी स्व अजित पवार यांनी केलेले सहकार्य अनमोल – वित्त राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्‍वाल

रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवात पद्मश्री सोनू निगम यांच्या गाण्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

B1न्यूज मराठी नेटवर्क

रामटेक शहर व पंचक्रोशीतील रसिकांनी दिला उदंड प्रतिसाद

नागपूर : महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या रामटेक येथील पुरातन श्रीराम व इतर मंदिरे, येथील तलावांचे वैभव लक्षात घेवून सांस्कृतिक व पर्यटनाच्या माध्यमातून विकासासाठी स्व अजित पवार यांनी दिलेले योगदान व सहकार्य कायम स्मरणात राहणारे असल्याचे प्रतिपादन वित्त राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्‍वाल यांनी केले.

रामटेक येथील नेहरू मैदानावर आयोजित रामटेक पर्यटन व सांस्कृतिक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित सोनू निगम लाईव्ह कन्सर्ट कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना राज्यमंत्री जैस्वाल यांनी भविष्यात रामटेक येथे एक लाख प्रेक्षक क्षमतेचे भव्य मैदान विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे अशा मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना अधिक सोयी उपलब्ध होतील, असे ते म्हणाले.

त्यांच्या मनोगतानंतर पद्मश्रीने सन्मानित सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी एकापेक्षा एक सरस गाणे गात हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले. सोनू निगम यांनी आपल्या लोकप्रिय हिंदी गीतांसह मराठी गीतांचीही सादरीकरणे करत स्थानिक प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. त्यांच्या प्रत्येक गीतावर रसिकांनी भरभरून दाद देत संपूर्ण नेहरू मैदान दुमदुमून गेले. गीतांच्या तालावर प्रेक्षक झूमताना दिसत होते. महोत्सवाच्या समारोप दि. २ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या संगीतमय कार्यक्रमाने होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button