आरोग्यप्रशासनमहाराष्ट्रवाशिम

गर्भलिंग तपासणी केल्यास थेट गुन्हा दाखल !पीसीपीएनडीटी कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा !

B1न्यूज मराठी नेटवर्क

वाशिम : पीसीपीएनडीटी कायद्याच्या कडक अंमलबजावणीसाठी अनधिकृत गर्भपात किंवा गर्भलिंग तपासणीबाबत तक्रार असल्यास महाराष्ट्र राज्य पीसीपीएनडीटी टोल फ्री क्रमांक १०४, १८००२३३४४७५, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ८४५९८१४०६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. तक्रारदाराचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://amchimulgimaha.in असून या संकेतस्थळावर गर्भलिंग निदान प्रतिबंध, स्त्री भ्रूणहत्या रोखणे तसेच पीसीपीएनडीटी कायदा १९९४ (सुधारित २००३) व वैद्यकीय गर्भपात कायदा १९७१ (एमटीपी) संदर्भात तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तक्रारदार इच्छेनुसार नाव नोंदवू शकतो.

पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तक्रारीमुळे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यात यश आल्यास तक्रारदारास शासनामार्फत खबरी बक्षीस योजनेअंतर्गत १ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button