पुरस्कारबार्शीमहाराष्ट्र
शंकर लाखे यांना “महाराष्ट्र ग्रेट सोशल युथ आयकॉन 2026” पुरस्काराने सन्मानित

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आधार उद्योग प्रशिक्षण केंद्र माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यवसायाची दिशा देण्याचे काम गेली अकरा वर्षे झालं ते करतात याच कामाची दखल घेऊन त्यांना यावर्षीचा “महाराष्ट्र ग्रेट सोशल युथ आयकॉन2026” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
इचलकरंजी येथे ए जे फाउंडेशन वेल्फेअर फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य ) राष्ट्रीय प्रेरणा किरण गौरव सन्मान सोहळा इचलकरंजी कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात मराठी सिने अभिनेत्री. मा. प्रतीक्षा लोणकर (स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील राजमाता जिजाऊ आईसाहेब ची भूमिका साकारणाऱ्या) यांच्या शुभहस्ते यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



