उद्घाटनमहाराष्ट्रसोलापूर

वाचनाने जाणिवा समृद्ध होतात – नितीन वैद्य

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर दि. २२ : वाचन करणे हे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता सर्वंकष वाचन करण्याचे अभूतपूर्व असे फायदे असून वाचनाने आपल्या जाणिवा समृद्ध होत असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक नितीन वैद्य यांनी केले. सिद्धेश्वर पेठ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे , तालुका ग्रंथपाल धोंडीराम जेऊरकर, श्रीमती वृषाली हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा बाबत माहिती देऊन सर्व सार्वजनिक ग्रंथालयांनी यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कुंडलिक मोरे यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यात ग्रंथालयाचे खूप मोठे योगदान असून मराठी भाषा संवर्धनात सर्वांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद पाटील तर आभार प्रदर्शन संजय ढेरे , नियोजन प्रदीप गाडे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने वाचकांची उपस्थिती होती.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button