नगरपरिषदबार्शीमहाराष्ट्रमेळावायोजना

बार्शी नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 अंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांचा नोंदणी मेळाव्याचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बार्शी नगरपरिषदे तर्फे शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 अंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांचा नोंदणी मेळावा शुक्रवार दि. 23/01/2026 रोजी सकाळी 11.30 ते सायं. 5.00 या वेळेत बार्शी नगरापरिषदेच्या कर्मवीर मामासाहेब जगदाळे समिती सभागृह येथे आयोजित करण्यात येणार आहे. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी खालील आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

आवश्यक कागदपत्रे :

1.कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड ( आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक )

2.स्व मालकीच्या जागेची कागदपत्रे (खरेदीखत, 7/12 उतारा, सिटी सर्वे उतारा)

3.रु. 3 लाखापर्यंतचा उत्पन्न दाखला

4.बिनशेती आदेश व नकाशा, गुंठेवारी असल्यास प्रमाणपत्र व नकाशा

5.राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक

6.रेशनकार्ड

7.चालू घरपट्टी पावती

8.ज्या जागेत बांधकाम करावयाचे आहे तेथील सद्यस्थितीतील लाभार्थ्यांसाह फोटो

9.नोंदणी कृत बांधकाम कामगार असल्यास बांधकाम कामगार प्रमाणपत्र

तरी सर्व इच्छुक लाभार्थ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button