जिल्हा परिषद गटातून 08 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल, पंचायत समिती गणातून 11 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल
जिल्हा परिषद गटातून 169 अर्ज तर पंचायत समिती गणातून 291 अर्ज , एकूण 460 अर्ज विक्री
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून उमेदवारांची लगबग वाढताना दिसत आहे. अर्ज विक्रीला मोठा प्रतिसाद मिळत असला तरी प्रत्यक्ष दाखल अर्जांची संख्या तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे. अर्ज विक्री मोठ्या प्रमाणावर होत असली तरी अनेक गट व गणांमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल न झाल्याने राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून, शेवटच्या टप्प्यात अर्ज दाखल करण्याची उमेदवारांची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. इच्छुकांची भाऊ गर्दी जास्त असल्यामुळे पार्टीचे नेते देखील नेमकी उमेदवारी कोणाला द्यायचे याबाबत संभ्रमात असल्याचे चित्र दिसत आहे.
दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद गटासाठी 45 अर्ज तर पंचायत समिती गणासाठी 84 अर्ज असे एकूण अर्ज 129 अर्ज विक्री झाले आहेत. तसेच 20/01/2026 अखेरपर्यंत जिल्हा परिषद गटातून 169 अर्ज तर पंचायत समिती गणातून 291 अर्ज असे एकूण एकूण 460 अर्ज विक्री झाले आहेत.
आज दिनांक 20/01/2026 अखेर जिल्हा परिषद गटासाठी उपळाई (ठोंगे) – 01, पांगरी – 06, उपळे दुमाला – 03, पानगाव – 02, मालवंडी – 00, शेळगाव आर – 00 असे एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर पंचायत समिती गणासाठी उपळाई (ठोंगे) – 03, आगळगांव – 00, पांगरी – 00, कारी – 02, उपळे दुमाला – 00, गौडगाव – 00, बावी (आ.) – 00, पानगाव – 00, मालवंडी – 01, सासुरे – 05, मानेगाव – 02, शेळगाव आर – 01 असे एकूण 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, यामध्ये जिल्हा परिषद गटातून 08 उमेदवारांचे 12 अर्ज दाखल झाले आहेत तर पंचायत समिती गणातून 11 उमेदवारांचे 14 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा बार्शीचे तहसीलदार, एफ. आर. शेख यांनी दिली आहे.




