बार्शी तालुक्यातील सासुरे गणातून काशीनाथ क्षीरसागर यांचा अपक्ष अर्ज दाखल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील सासुरे पंचायत समिती गणातून वैराग पत्रकार संघाचे उपाध्यक्ष काशीनाथ क्षीरसागर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारितेतील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शेती आणि इतर समस्या समजून घेण्यात व त्यांचे निराकरण करण्यात ते निपुण आहेत.

“पत्रकार म्हणून मी अनेक वर्षे जनसामान्यांच्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. डिजिटल व प्रिंट मिडीया द्वारे जनजागृती केली आहे. आता पंचायत समिती सदस्य म्हणून प्रत्यक्ष प्रशासनात सहभागी होऊन सर्व समस्या सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील राहणार आहे,असे काशीनाथ क्षीरसागर यांनी सांगितले.

सासुरे गण हा बार्शी पंचायत समितीच्या महत्त्वाच्या गणांपैकी एक आहे. येथील ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि युवकांसाठी संधी यावर त्यांचा विशेष भर असेल. स्थानिक स्तरावर सामाजिक कार्य आणि युवकांमध्ये लोकप्रिय असलेले काशीनाथ क्षीरसागर यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघात चुरस वाढण्याची शक्यता आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या