कर्मवीर मामासाहेब जगदाळे १२३ व्या जयंतीनिमित्त खो-खो स्पर्धेचे आयोजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व सोलापूर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त विभागीय निमंत्रित महिला गट खो-खो स्पर्धा आयोजन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे संस्थापक व संवर्धक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे दिनांक 20 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीत विभागीय निमंत्रित महिला गट खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. पी. शिखरे सर यांनी दिली.
या स्पर्धा आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस प्राध्यापक डॉ. चंद्रजीत जाधव यांनी मान्यता दिली आहे. या स्पर्धेत धाराशिव, सांगली, पुणे, ठाणे, सोलापूर व रत्नागिरी या जिल्ह्यातील एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास रुपये 21000 द्वितीय क्रमांकास रुपये 15000 व तृतीय क्रमांकास रुपये 11000 रोख, प्रमाणपत्र व ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी व खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.




