जयंतीबार्शीमहाराष्ट्र

स्वराज्य स्वराज्य प्रेरिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांची स्टॉप बार्शी या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जयंती साजरी

18 पगड जाती 12 बलतेदारांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेची शिवरायांना प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊंनी दिली : आनंद काशीद जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : ज्या काळामध्ये मोगल शाही आदिलशाही निजामशाही या सर्वांनी सत्तेचा उन्माद महाराष्ट्रामध्ये मांडला होता मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना या महाराष्ट्रामध्ये घडत होत्या. त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा देऊन 18 पगड जाती 12 बोलतेदारांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा देऊन मानवतेला भूषण वाटावे असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बुद्धीच्या तुर्यातून जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली. या छत्रपती शिवराय व संभाजी महाराजांच्या जीवनातून आपण प्रेरणा घेऊन आयुष्याचा प्रवास करायला हवा असे प्रतिपादन यावेळी आनंद काशीद यांनी केले.

यावेळी प्रतिमापूजन सामाजिक कार्यकर्त्या शितल मांजरे यांच्या हस्ते जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विक्रम बापू गायकवाड, मनोज मोरे, इमाम भाई लांडगे, सय्यद ,राजवीर काशीद, यांच्यासह मोठ्या संख्येने जिजाऊ प्रेमी उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button