राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाने बार्शीत क्रीडा उत्साहाला उधाण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या वतीने, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२५–२६ च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या कर्मवीर क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात पार पडले.

या स्पर्धेचे उद्घाटन दिलीपरावजी सोपल , आमदार बार्शी विधानसभा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदनजी जगदाळे,l उपाध्यक्ष – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी हे होते.

उद्घाटन समारंभास प्रमुख उपस्थिती म्हणून तैमूर मुळाणी (मुख्याधिकारी, बार्शी नगर परिषद), बालाजी कुकडे (पोलीस निरीक्षक, बार्शी), जे. सी. शितोळे (खजिनदार), ए. पी. देबडवार (सहसचिव), मा. पी. टी. पाटील(सचिव) तसेच मा. डॉ. बी. वाय. यादव (अध्यक्ष) यांची उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचा आयोजक संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उद्घाटनप्रसंगी आमदार दिलीपरावजी सोपल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कबड्डी हा ग्रामीण भागातील मातीतून जन्मलेला खेळ असून तो युवकांमध्ये शिस्त, संघभावना, धैर्य व जिद्द निर्माण करतो. अशा राज्यस्तरीय स्पर्धांमुळे खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते. अध्यक्षीय भाषणात नंदनजी जगदाळे यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडाशिक्षणाला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ज्योती डमरे प्रा. मोहिनी शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. तर आभारप्रदर्शन मा. डॉ. किरण चपटे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य मा. डॉ. संजय करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोहित डिसले (स्पर्धा सचिव) व श्रीमती रुपाली शिंदे (स्पर्धा सहसचिव) यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

उद्घाटन समारंभास विविध महाविद्यालयांतील खेळाडू, क्रीडाप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे बार्शी शहराच्या क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले असून स्पर्धेतील सामने अत्यंत चुरशीचे ठरणार असल्याचे मत उपस्थित क्रीडाप्रेमींनी व्यक्त केले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या