बार्शीमहाराष्ट्रशैक्षणिक

सुयश विद्यालयाचा अभिमानास्पद यश सोहळा : राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत झळकणार सुयशचे विद्यार्थी

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर येथे दिनांक २१ डिसेंबर २०२५, रविवार रोजी पार पडलेल्या अबॅकस रिजनल लेव्हल स्पर्धेत सुयश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप उमटवली आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुयश विद्यालयातील एकूण १५ विद्यार्थ्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

A कॅटेगरी मधून
शरण्या पायघन, सृष्टी पायघन, शौर्या पायघन, शिवण्या पाटील, ओवी माने, स्मरणिका निचल, आराध्या शिराळ
B कॅटेगरी मधून
निष्ठा भोसले, अभिराज गरड, प्रज्ज्वल शेटे
C कॅटेगरी मधून
वेणु बुरांडे
D कॅटेगरी मधून
श्रेया बोटकर
E कॅटेगरी मधून
अर्णव फल्ले
I कॅटेगरी मधून
अदिती फल्ले व प्रज्वल शेटे
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जलद गणनाशक्तीने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली.

विशेष उल्लेखनीय यश
सोलापूर जिल्ह्यातून दिला जाणारा “मॅथ मॅजिशियन अवॉर्ड” सुयश विद्यालयातील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी कु. शरण्या राहुल पायघन हिला मिळाल्याने विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल सुयश विद्यालयाचे संस्थापक शिवदास नलवडे साहेब, संस्थेच्या मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे मॅडम, प्रसाद नलवडे सर, मुख्याध्यापिका श्रीमती अलका जगताप मॅडम तसेच उप – मुख्याध्यापक संदीप येवले सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुयश विद्यालयातील विद्यार्थ्यांचे हे यश निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असून, आगामी राज्यस्तरीय स्पर्धेतही सुयशचे विद्यार्थी दैदीप्यमान कामगिरी करतील, असा विश्वास सर्व स्तरांतून व्यक्त केला जात आहे.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button