बार्शी शहर पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी चार वर्षांपूर्वी दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस दिल्ली येथे अटक

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : क्रेडीट कार्ड फसवणुकीच्या चार वर्षांपूर्वी दाखल गुन्ह्यातील आरोपीस दिल्ली येथून अटक करून बार्शी शहर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम १ लाख ९८ हजार २०८ रुपये फिर्यादीस परत मिळवून दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १३ फेब्रुवारी २०२२ रोजी फिर्यादी महादेव विठ्ठल मिरगणे (वय ५३, व्यवसाय शिक्षक, रा. म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड, बार्शी) यांना क्रेडीट कार्ड विभागातून बोलत असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला.

क्रेडीट कार्ड ब्लॉक करण्याच्या बहाण्याने मोबाईलवर आलेला ओटीपी सांगण्यास भाग पाडून काही वेळातच त्यांच्या क्रेडीट कार्डवरून १,९८,२०८ रुपयांची रक्कम परस्पर काढून घेण्यात आली. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाणे तसेच बार्शी शहर पोलीस ठाणे करत होते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी २०२२ मधील प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेतला असता हा गुन्हा अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी सदर गुन्ह्याचा पुढील तपास बार्शी शहर पोलीस ठाण्याकडे सोपवून आवश्यक सूचना दिल्या.

तपासात आरोपी हा दिल्ली येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगीने पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली पथक दिल्ली येथे पाठविण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नॉर्थ दिल्ली परिसरात वास्तव्यास असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर बाजार पोलीस ठाणे, नॉर्थ दिल्ली यांच्या सहकार्याने आरोपी नरेश महेशचंद शर्मा (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. बगीची रघुनाथ, नॉर्थ दिल्ली) यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेण्यात आले व बार्शी येथे आणण्यात आले.

बार्शी येथे आणल्यानंतर आरोपीकडून फिर्यादीची संपूर्ण रक्कम १,९८,२०८ रुपये काही वेळातच फिर्यादीस परत देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तसेच पोसई महेश गळगटे, पोसई अभय माकणे, पो. कॉ. दिगंबर बरबडे, पो. कॉ. सचिन नितनात, पो. कॉ. अवी पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. रतन जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.

दरम्यान, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, क्रेडीट कार्ड, एटीएम कार्ड, आधार कार्ड किंवा बँकेकडून बोलत असल्याचे सांगणाऱ्या अनोळखी व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत ओटीपी देऊ नये. तसेच सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तात्काळ १९३० या क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवावी.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या