पुरस्कारबार्शीमहाराष्ट्रसोलापूर

बार्शीतील तृतीयपंथी किरण मस्तानी यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर तर्फे भव्य जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्याचे संपन्न : सामाजिक कार्यात आदर्श ठरलेल्या बार्शीतील तृतीयपंथी किरण मस्तानी हिचा शाही थाटात विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 24 डिसेंबर रोजी भव्य व दिव्य अशा पुरस्कार सोहळा संपन्न. या सोहळ्यामध्ये समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आले असून, यामध्ये दैनिक संचार चे उपसंपादक तथा स्मार्ट अकॅडमी चे संचालक सचिन वायकुळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी येथील सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणारे तृतीयपंथी किरण मस्तानी यांची विशेष निवड करण्यात आली होती.

पारलिंगी (तृतीयपंथी) किरण मस्तानी हिचा आज सोलापुरात पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी साहेब, संतोषभाऊ पवार, संपादक राकेश टेळे साहेब व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत साहेब , पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे साहेब इतर मान्यवर उपस्थित होते.

या पुरस्कारानंतर सोलापूर जिल्ह्यासह बार्शी परिसरातून किरण मस्तानी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार बांधवांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नसून, समाजातील सर्वसामान्य घटकांच्या संघर्ष व योगदानाची पावती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button