अभ्यासासोबतच क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय ओळख; ग्रामीण भागातील मुलींसमोर मांडला यशाचा नवा आदर्श

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील शेळगाव (आर) येथील एका प्राथमिक शिक्षक दांपत्याच्या कन्येने आपल्या जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे उत्तुंग शिखर गाठले आहे. डॉ. ऋचा विष्णू गोडगे हिने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात ८४ वा क्रमांक पटकावत आयएएस (IAS) होण्याचे आपले स्वप्न साकार केले आहे. आहे. तिच्या तिच्या या यशाने केवळ बार्शी तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा नावलौकिक वाढला आहे.

डॉ. ऋचा यांचे प्राथमिक शिक्षण शेळगाव (आर) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर येथून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पूर्वील शिक्षणासाठी त्यांनी वैद्यकीय क्षेत्राची निवड केली आणि देशातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘एम्स’ (AIIबाद येथून एमबीबीएस (MBBS) पदवी संपादन केली.

डॉ. ऋचा केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही तितक्याच सक्रिय आहेत. त्या टेबल टेनिसच्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असून त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. अभ्यासासोबतच छंद जोपासल्याने एकाग्रता वाढण्यास मदत झाल्याचे त्या सांगतात.

ऋचा यांचे वडील विष्णू गोडगे आणि आई दीपाली गोडगे हे दोघेही उत्तर सोलापूर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना उच्च शिक्षणासाठी सतत प्रोत्साहन दिले. ऋचा यांचा भाऊ हर्षवर्धन हा देखील व्हीआयटी (VIT) वेल्लोर येथे संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

वेल्लोर “शाळेत असल्यापासूनच मी अभ्यासात सातत्य ठेवले होते. आई-वडील शिक्षक असल्याने त्यांच्याकडून मला नेहमीच प्रेरणा मिळाली,” अशा भावना डॉ. ऋचा यांनी व्यक्त केल्या. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही काळ त्यांनी घरातून अभ्यास केला आणि नंतर दिल्ली येथे जाऊन विशेष तयारी केली. “आजचे यश हे माझ्या पालकांच्या कष्टाचे फळ आहे. इतर मुलींनीही जिद्दीने अभ्यास करून आपल्या पालकांचे नाव उज्ज्वल करावे,” असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

ग्रामीण भागात राहून, मर्यादित साधनसामग्री असतानाही केवळ सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर डॉ. ऋचा यांनी मिळवलेले हे यश राज्यातील तमाम तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या