भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असून, त्याग, संघर्ष आणि बलिदानाच्या शताब्दी वर्षानिमित्त सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले आहे. “बुद्धीजीवी वर्ग व कष्टकऱ्यांची चळवळ” या विषयावर सरफराज अहमद, सोलापूर प्रसिद्ध लेखक व पत्रकार तसेच “फॅसिझमची नवी रुपे” या विषयावर कॉ. प्रा. तानाजी ठोंबरे, भाकप माजी राज्य कार्यकारिणी सदस्य तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉ. डॉ. प्रविण मस्तुद जिल्हा सचिव, भाकप हे असतील. कार्यक्रम 26 डिसेंबर 2025 रोजी आयटक कामगार केंद्र भगवंत मैदान येथे होणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने गेल्या शंभर वर्षांत भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती – संग्राम, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा ऐतिहासिक संघर्षांत भूमिका बजावली. स्वातंत्र्योत्तर काळातही भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कामगार, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरील आंदोलनांसह भारतीय संसदेमध्येही पक्षाच्या नेत्यांनी सामान्य जनतेचा आवाज बुलंद केला आहे. सरंजामी, जातीय व कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या शोषणामुळे कामगार, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, युवक, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व कष्टकरी जनता नव्या गुलामगिरीकडे ढकलली जात असल्याने कष्टकरी वर्गाचा असणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची पुढील काळात भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना २६ डिसेंबर १९२५ साली कानपूर येथे पहिल्या पक्ष परिषदेत झाली होती. सुरुवातीपासनच पक्षाने पूर्ण स्वातंत्र्याची आणि समाजवादाची मागणी लावून धरली होती. १९४६ ते १९५१ दरम्यान तेलंगणशतील सशस्त्र शेतकरी उठाव हा पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठा लढा मानला जातो. स्वातंत्रोत्तर काळात अनेक महत्त्वाचे लढे या पक्षाने दिले. जनतेच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आक्रमक भूमिका घेतली.

केंद्र व राज्य सरकारविरोधात जनतेच्या बाजूने भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शताब्दी वर्षानिमीत्ताने केंद्र व राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आपले शक्तीप्रदर्शन करीत राहील.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या या होत असलेल्या कार्यक्रमासाठी कष्टकरी जनतेने उपस्थित राहण्याचे अहवाल भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या सोलापूर जिल्हा कौन्सीलच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या