नागपूरमहाराष्ट्रमुंबई

हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर नागपुरात सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहांचे कामकाज

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुंबई , नागपूर : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे घेण्यात येणार असून, १३ डिसेंबर (शनिवार) आणि १४ डिसेंबर (रविवार) या शासकीय सुट्टीच्या दिवशीदेखील दोन्ही सभागृहांचे कामकाज आयोजित करण्याचा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारच्या रोजी घेण्यात आला.

भारताच्या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २६ मार्च २०२५ रोजी विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणाचे संकलित पुस्तक महाराष्ट्र विधिमंडळ वि. स. पांगे संसदीय प्रशिक्षण केंद्राने तयार केले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते ९ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी बैठकीत दिली.

बैठकीस विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, तसेच मंत्रीमंडळातील चंद्रकांतदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे-पाटील, ॲड. आशिष शेलार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button