अरुण (भाऊ) कापसे यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सहकार विभागाच्या ‘प्रदेश सहसंयोजक’ पदावर नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूरचे ज्येष्ठ सहकार अभ्यासक आणि राजकीय क्षेत्रात अनेक महत्त्वाची पदं भूषवलेले अरुण सुबराव कापसे यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र राज्य सहकार प्रकोष्ठाच्या ‘प्रदेश सहसंयोजक’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे विधान परिषद गटनेते आणि सहकार प्रकोष्ठाचे संयोजक प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आली असून, ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
अरुण कापसे यांचा सहकार आणि राजकारणातील अनुभव अत्यंत समृद्ध आहे. 1995 साली ज्योतिबाचिवाडीचे सरपंच म्हणून त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य कंझुमर्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे माजी संचालक, जिल्हा खरेदी विक्री संघ सोलापूरचे माजी व्हॉइस चेअरमन, बँक असोसिएशन महाराष्ट्र राज्य व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत. भाजपमध्येही त्यांनी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले असून, पक्षाचे वरिष्ठ नेते प्रवीण दरेकर यांच्याशी त्यांचे विशेष स्नेहसंबंध आहेत.
विशेष म्हणजे, बार्शीचे माजी आमदार मा. राजेंद्र राऊत यांच्याशीही अरुण कापसे यांचे दीर्घकाळचे राजकीय व सामाजिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान अधिक प्रभावी ठरले आहे. या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सहकार क्षेत्रात आनंदाची लाट पसरली असून, विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



