बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

बार्शी आगार येथे बस स्थानक वेळापत्रकाचे अनावरण सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेकडे आलेल्या मागणीनुसार बार्शी आगार बस स्थानकाचे वेळापत्रकाचे अनावरण श्रीमती मधुरा संदिपान जाधवर आगार प्रमुख गणेश चव्हाण वाहतूक निरीक्षक, जयसिंग परदेशी वाहतूक निरीक्षक वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघुलकर ओन्ली समाजसेवा बहुजेशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी संस्थेचे सचिव अजय तिवारी, सुनील फल्ले, नामदेव गरंडे, सुरेंद्र स्वामी, रेखा विधाते, रागिनी झेंडे, सुजाता अंधारे, रेखा सरवदे कुमारी आर्या कदम हे सन्माननीय सदस्य हजर होते.

यापूर्वीही संस्थेच्या माध्यमातून बार्शी आगार येथे विविध उपक्रम राबवले आहेत. बार्शी शहरात ओन्ली समाजसेवा बहुउद्देशी संस्थेचे कार्य समाज उपयोगी असते असे उदगार आगार प्रमुख मधुरा जाधवर यांनी काढले. हे वेळापत्रक बनवण्यासाठी पुरुषोत्तम वाघुलकर यांचे सहकार्य लाभले याप्रसंगी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी यांनी सर्वांचे आभार मानले.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button