बार्शीमहाराष्ट्र

प्रा. डॉ.राहुल पालके यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन व अंधश्रध्दा निमूर्लन या विषयावर व्याख्यान संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विज्ञान शिक्षणाचा भर प्रामुख्याने विज्ञान-तंत्रज्ञान हा विषय समजून घेण्यासाठी लागणार्‍या तांत्रिक कुशलतेवर असतो. मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनात निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही विचारशृंखला असते.विज्ञान व वैज्ञानिक दृष्टिकोन या भिन्न संकल्पना आहेत, असे मत प्रा. डॉ. राहुल पालके यांनी मांडले. कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी शालेय आंतरवासिता व सरावपाठ प्रात्यक्षिक अंतर्गत आयोजित ‘वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रध्दा निमूर्लन’ या विषयावर शाह धारसी जीवन मॉडेल हायस्कूल, बार्शी येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक देवकर सर यांनी भूषविले. याप्रसंगी प्रा. डॉ. डिसले सर, मसाप शाखा बार्शीचे अध्यक्ष पां. नि. निपाणीकर, एस. बी. काकडे हे उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विज्ञान गीताने झाली. त्यातून विद्यार्थ्यांची उत्सुकता ताणली. पुढे बोलताना पालके म्हणाले, वैज्ञानिक दृष्टीकोन, मानवतावाद व जिज्ञासावृत्ती बाळगणे हे मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत नमूद आहे. त्याचबरोबर त्यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या डिस्कव्हरी ऑफ इंडिया(भारताचा शोध) या पुस्तकाचा उल्लेख केला.

नेहरुंनी सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन अर्थात केवळ विज्ञानाच्या मर्यादांपलीकडे जाऊन, अंतिम उद्देश, सौंदर्य, चांगुलपणा आणि सत्य यांसारख्या मूल्यांचा विचार करणे होय याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. दैनंदिनी जीवनात वैज्ञानिक दृष्टी कशी दिसून येते याची उदाहरणे देत जयंत नारळीकर यांची प्रयोगशीलता याबाबत माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सानिका बाबर यांनी केले. रणजित भालेराव यांनी कार्यक्रमाचे तांत्रिक संयोजन उत्तम पद्धतीने केले. याप्रसंगी शिक्षक, शिक्षिका, बी.एड. प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button