बार्शीसामाजिक

कलाशिक्षक डाॅ. मोहम्मद बागवान यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित जनता विद्यालय, येडशी तालुका, जिल्हा-उस्मानाबाद कलाशिक्षक डाॅ.मो मोहम्मद बागवान सर, यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक हा पुरस्कार दिनांक 18 फेब्रुवारी 23 रोजी अल्पबचत भवन कलेक्टर ऑफिस जळगाव येथे माजी सैनिकी अधिकारी सुरेश पाटील काबरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ महेंद्र काबरा यांच्या हस्ते व गोदावरी फाउंडेशनच्या डॉ.केतकी पाटील, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री बाळू धुमाळ, जोगेश्वरी सी फूड च्या संचालिका कविता पाटील, सिंगल वूमन फाउंडेशन च्या अध्यक्षा मीनाक्षी चव्हाण, साहित्यिका ललिता टोके, राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष संदीप वाघ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघ यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असून गरजू व्यक्तींना विविध प्रकारची मदत करते.सदर पुरस्कार सोहळ्यात कृषी, विज्ञान ,उद्योग ,शिक्षण ,क्रीडा,कला क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.मिळालेल्या पुरस्काराबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय यादव, उपाध्यक्ष श्रीनंदन जगदाळे,सचिव श्री पी .टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रामा गाढवे, पांगरे सर, नलवडे सर व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button