Daily Update

बार्शी न्यायालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे, कॉमन मिनिमम प्रोग्रॅम 2024, माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या आदेशाप्रमाणे तसेच अध्यक्ष, विधी सेवा समिती बार्शी तथा जिल्हा न्यायाधीश-1 जयेंद्र जगदाळे यांच्या कल्पनेतून बार्शी न्यायालयाच्या आवारात जागतिक आरोग्य दिनानिमित्त दिनांक 06 एप्रिल 2024 वार शनिवार सकाळी 10 वाजता न्यायालय आवारात सर्व न्यायिक अधिकारी, न्यायिक कर्मचारी, वकील संघाचे सदस्य, पक्षकार यांच्यासाठी भव्य असे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेले होते. त्यासाठी अनुक्रमे श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी तसेच ग्रामीण रुग्णालय, बार्शी यांनी सहभाग नोंदवला.

सुरुवातीला दोन्ही शिबिरांचे उद्घाटन जयेंद्र जगदाळे साहेब, जिल्हा न्यायाधीश-1 बार्शी यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व न्यायिक अधिकारी, लायन्स क्लब बार्शीचे पदाधिकारी तसेच वकील संघाचे अध्यक्ष, ग्रामीण रुग्णालय, बार्शी मेडिकल ऑफिसर, श्रीमान रामबाई शहा रक्तपेढीचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटन पर अध्यक्षीय भाषणात जगदाळे यांनी आरोग्याची काळजी घेणे सर्वांसाठी किती गरजेचे आहे तसेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज होत असलेल्या दोन्ही शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा व रक्तदान कसे श्रेष्ठदान आहे याबाबतही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास एल. एस. चव्हाण जिल्हा न्यायाधीश-2, श्रीमती आर. एम. कंटे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,, एस. बी. विजयकर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर ,जे. आर. पठाण, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ, श्रीमती एच. यु. यु. पाटील चौथे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, तसेच ग्रामीण रुग्णालय बार्शीचे मेडिकल ऑफिसर शितल बोपलकर , श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे अजित कुंकूलोळ, लायन्स क्लबचे ॲड. विकास जाधव व त्यांचे पदाधिकारी तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड. काकासाहेब गुंड, उपाध्यक्ष ॲड. बापूसाहेब गलांडे, सर्व न्यायिक कर्मचारी, वकील संघाचे सदस्य हे उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात न्यायिक कर्मचारी वर्ग तसेच वकील संघाचे सदस्य यांनी दोन्ही शिबिरांचा लाभ घेतला. मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी वर्ग तसेच वकील संघाच्या सदस्यांचा सहभाग होता.

ग्रामीण रुग्णालय, बार्शी यांच्या टीमने लाभधारक 155 जणांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे श्रीमान रामबाई शहा रक्तपेढी, बार्शी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचा दिवसभर जवळपास 79 जणांनी रक्तदान देऊन सहभाग नोंदविला त्याबद्दल लाभधारकांना कृतज्ञता प्रमाणपत्र रक्तपेढीच्या वतीने देण्यात आली. अशाप्रकारे दोन्ही यशस्वी शिबिरांची सांगता दुपारी पाच वाजता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button